सांप्रदायिक फासीवाद्यांचे जनतेत फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा

शहीदे-आजम भगतसिंहांच्या संदेशाचे स्मरण करा
सांप्रदायिक फासीवाद्यांचे जनतेत फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा
जनतेची झुंजार एकता निर्माण करा

मित्रहो,
देशात पुन्हा एकदा जनतेमध्ये धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. देशभरात धार्मिक कट्टरतेच्या आगीला हवा दिली जात आहे. लोक महागाई, बेरोजगारी आणि गरीबीने ग्रासलेले असताना त्यांना रामजादेआणि हरामजादेयांच्यामध्ये विभागण्यात येते आहे. जेव्हा जनता दरवाढ, बेकारी आणि दारिद्र्याने हैराण असते त्याच वेळी अचानक लव जिहाद’, ‘घरवापसीआणि हिंदू राष्ट्र निर्माणाचे पिल्लू कां सोडले जाते, यावर आपण कधी विचार केला आहे? निवडणुका जवळ येतात त्याच वेळी दंगे कां भडकतात? जनता महागाई आणि भ्रष्टाचारामुळे हैराण झालेली असते त्याच वेळी सांप्रदायिक तणाव कां भडकतो? हा केवळ योगायोग आहे का? ज्यामध्ये तोगडिया, ओवेसी, सिंघल किंवा योगी आदित्यनाथ यांच्यासारखे लोक मारले गेले आहेत, असा स्वातंत्र्यानंतरच्या काळातील एक तरी दंगा आपल्याला आठवतो का? दंग्यांमध्ये कधी कुठल्या कट्टर नेत्याचे घर जळाले आहे का? नाही! दंग्यांमध्ये नेहमीच तुमच्या-आमच्यासारखे लोकच मारले जातात, बेघर होतात, अनाथ होतात. होय! आपल्यासारखेच लोक जे आपल्या मुलाबाळांना एक चांगले जीवन देण्यासाठी काबाडकष्ट करीत असतात. ज्यांच्या ताटांमधून एक एक करून भाजी, डाळ गायब होते आहे. ज्यांची तरुण मुले रस्त्यांवर बेरोजगार फिरत आहेत. ज्यांचे भविष्य अधिकाधिक अनिश्चित होते आहे, जे सतत बरबादीच्या दरीत कोसळत आहेत. जेव्हा आपला संयम तुटायची वेळ येते त्याच वेळी मंदिर आणि मशिदीचा मुद्दा उचलला जातो. देशातील धनिकांच्या, अमीरजाद्यांच्या आणि दैत्याकार कंपन्यांच्या पैशांवर चालणारे तमाम राजकीय पक्ष त्याच वेळी धार्मिक कट्टरता भडकवतात. हिंदूंना मुसलमानांचे आणि मुसलमानांना हिंदूंचे शत्रू बनवले जाते आणि आपापसात लढविले जाते. आणि आपण लढतो, हा आपला मूर्खपणा आहे. दंगे होतात, सामान्य माणसं मरतात, आणि सामान्य लोकांच्या चितांवर देशातील अमीरजादे व त्यांचे पक्ष आपल्या पोळ्या भाजून घेतात.
कोणाचे ‘‘अच्छे दिन’’ आणि कोणाचा ‘‘विकास’’?
नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे एनडीए सरकार सत्तेत येण्याअगोदर देशातील जनतेला तऱ्हेऱ्हेची स्वप्ने दाखविण्यात आली. महागाई आणि बेरोजगारी संपविली जाईल, पेट्रोल डिझेलपासून घरगुती गॅसचे दर कमी केले जातील, रेल्वेचे भाडे वाढविले जाणार नाही, भ्रष्टाचाराला पायबंद घातला जाईल आणि स्विस बँकेमधून काळा पैसा आणला जाईल म्हणून दावा करण्यात आला. ‘‘अच्छे दिन’’ आयेंगे! परंतु सरकार बनल्यानंतर सात महिन्यांच्या आत सामान्य कष्टकरी जनतेला कळून चुकले आहे की ‘‘चांगले दिवस’’ कुणाचे आले आहेत! घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आले, रेल्वेचे भाडे वाढवण्यात आले, श्रमकायद्यांद्वारे कामगारांना मिळणारी सुरक्षा काढून घेण्यात आली, पब्लिक सेक्टरमधील नफा कमविणाऱ्या तमाम कंपन्यांचे खाजगीकरण केले जाते आहे. याचाच अर्थ सरकारी
कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात. ठेका पद्धतीला अप्रेंटिससारख्या गोंडस नावांखाली उत्तेजन दिले जाते आहे, नवीन भरती कुठेच होत नाहीये, आणि जर कुठे होत असेल तर स्थायी कर्मचारी म्हणून नाही तर ठेक्यावर. पेट्रोलियम उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय दर इतके घसरले आहेत की सरकार पेट्रोल ४० रुपये लिटर दराने विकू शकते, परंतु मोदी सरकारने वेगवेगळे कर आणि शुल्क वाढविले आहे आणि त्यामुळे दरांमध्ये विशेष फरक पडलेला नाही. स्विस बँकेमध्ये काळा पैसा बाळगणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांची नावे वेगवेगळी कारणे देऊन गुप्त ठेवली जात आहेत. महागाई कमी होणे तर दूरच राहिले, उलट किरकोळ विक्रीच्या पातळीवर खाण्यापिण्याच्या जिन्नसांबरोबरच प्रत्येक आवश्यक वस्तू पूर्वीपेक्षा महाग झाली आहे. रुपयाला मजबूत करणे दूरच राहिले, उलट रुपयाच्या मूल्यामध्ये विक्रमी घसरण केली जात आहे ज्यामुळे महागाई आणखी वाढते आहे. केंद्रात सत्तेत येताच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचे पूर्वीचे रेकॉर्ड तोडायला सुरुवात केली आहे. बलात्काराचे आरोप असलेले नेता-मंत्री मोदी सरकारमध्ये बसलेले आहेत.

 ‘‘आपल्या देशात काही ठरावीक लोक आपल्या स्वार्थासाठी लोकांना धर्माच्या नावाखाली एकमेकांशी लढवतात. धर्म आणि ईमानाच्या नावाखाली होणारे हे भीषण धंदे रोखण्यासाठी साहस आणि दृढतेनिशी झटले पाहिजे!’’
गणेश शंकर विद्यार्थी (सांप्रदायिक उन्मादाविरोधातील लढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक)
दुसरीकडे, अंबानी, अदानी, बिर्ला, टाटा यांच्यासारख्या देशातील सर्वांत मोठ्या धनिकांवर मोदी सरकार जणू बक्षिसांची खैरात करीत आहे. त्यांना वेगवेगळ्या करांतून सूट दिली जाते आहे, जवळजवळ मोफत वीज, पाणी, जमीन दिली जाते आहे, व्याजरहित कर्ज दिले जाते आहे, श्रमकायद्यांतून सूट दिली जाते आहे, देशाची नैसर्गिक संपदा नाममात्र किंमतीत त्यांना सोपविली जाते आहे. ही संपदा खरे पाहता
देशातील जनतेची सामूहिक संपत्ती आहे! खाजगीकरण करून तुमच्या आमच्या पैशांतून उभारलेले सार्वजनिक उपक्रम कवडीमोल किंमतीत या नफेखोरांना विकले जात आहेत. स्वदेशी’, ‘देशभक्ती’, ‘राष्ट्रभक्तीचा ढोल बडवत सत्तेत आलेल्या मोदींनी सरकार बनताच विमा, संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसह तमाम क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. हेच भाजपवाले मनमोहनसिंह सरकारद्वारे करण्यात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीला विरोध करीत होते, हे तुम्हांला आठवतं का? मोदी सरकार बनल्यापासून गुजरातसह देशाच्या विविध भागांमध्ये गुंतवणूक संमेलनांमध्ये मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी देशातील निसर्गाला आणि जनतेला लुटण्यासाठी देशी विदेशी कंपन्यांना खुली सूट दिली आणि त्याला मेक इन इंडियाअभियानाचे नाव दिले आहे! याचा अर्थ आहे, ‘‘या, जगभरातील मालकांनो, भांडवलदारांनो आणि व्यापऱ्यांनो, या! आमच्या देशातील स्वस्त श्रम आणि नैसर्गिक संसाधने मनमुराद लुटा!’’ अमेरिकेत जाऊन नरेंद्र मोदींनी तेथील औषध कंपन्यांसोबत एक करार केला ज्याच्यामुळे कित्येक जीवनरक्षक औषधे कित्येक पट महाग झाली आहेत व सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहेत. तमाम कंपन्यांना आता पूर्ण सूट देण्यात आली आहे की ते कामगार व कर्मचाऱ्यांकडून हवा तसा ओव्हरटाईम करून घेऊ शकतात. देशातील वरच्या १५ टक्के श्रीमंतांना सगळ्या सुविधा दिल्या जात आहेत, टॅक्समध्ये सूट आणि सवलती दिल्या जात आहेत. त्यांच्यासाठी चकचकीत शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, अम्युजमेंट पार्वâ! आणि देशातील ८५ टक्के सामान्य माणसाला सांगितले जात आहे की त्यांना ‘‘विकासा’’साठी पॅâक्टरी, दुकाने, हॉटेल आणि कचेऱ्यांमध्ये झिजावे लागेल. आता देशातील श्रीमंतांच्या विकासासाठी कष्टकरी जनतेलाच किंमत मोजावी लागेल. त्यांनाच पोटाला चिमटा देऊन ‘‘हिंदू राष्ट्र’’ निर्माण करावे लागेल. आणि जर कोणी अमीरजाद्यांच्या ‘‘चांगल्या दिवसां’’बद्दल प्रश्न उपस्थित करील तर त्याला राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही ठरवले जाईल!
‘‘लोकांना आपापसात लढण्यापासून रोखण्यासाठी वर्गचेतनेची आवश्यकता आहे. गरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेतम्हणूनच तुम्ही त्यांच्या डावपेचांपासून सावध राहिले पाहिजेव त्यांच्या नादी लागून काहीबाही करता कामा नये. जगातील सर्व गोरगरिबांचेमग ते कोणत्याही जातीचेवर्णाचेधर्माचे वा राष्ट्राचे असोतअधिकार सारखे आहेत. धर्मवर्णवंश आणि राष्ट्रियतेचे भेदभाव संपवून तुम्ही एकजूट व्हावे आणि सरकारची शक्ती आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न करावेतयातच तुमचे भले आहे.’’
शहीदे आजम भगत सिंह (सांप्रदायिक दंगे और उनका इलाज’ या लेखामधून)

सांप्रदायिक तणावामुळे कोणाला लाभ होतो?
श्रीमंतांच्या ‘‘चांगल्या दिवसां’’ची किंमत सामान्य लोकांच्या खिशातूनच वसूल केली जाते आहे हे उघड आहे. परंतु सामान्य लोक ‘‘अच्छे दिन’’चे वास्तव समजू लागले आहेत आणि त्यांच्यामध्ये नाराजी आणि चीड वाढते आहे. म्हणूनच मोदी सरकार आपल्या लोकविरोधी पाउलांबरोबरच आणखी दोन चाली खेळते आहे. एकीकडे स्वच्छता अभियान’, तिर्थस्थळांसाठी रेल्वेगाड्या यांसारख्या योजना राबविल्या जात आहेत जेणेकरून लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून विचलित करून स्वस्तातली लोकप्रियता मिळवली जाऊ शकते. त्याचवेळी दुसरीकडे देशभरात सांप्रदायिक तणाव भडकवला जात आहे. अगोदर लव जिहादचा गोंधळ घालण्यात आला, जो खोटा सिद्ध झाला, त्यानंतर घरवापसीच्या नावावर तणाव निर्माण केला जात आहे, ‘रामजादे हरामजादेसारखी वक्तव्ये केली जात आहेत. भगवे ब्रिगेड मोदी सरकार म्हणजे ८०० वर्षांनंतरचे हिंदू राज्यअसल्याचे सांगत आहे, काही वर्षांतच उभा भारत देश हिंदू बनविण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, हिंदू महिलांना चार चार मुले जन्माला घालण्यास सांगितले जात आहे. भगव्या ब्रिगेडच्या हिंदुत्त्ववादी सांप्रदायिकतेबरोबरच ओवेसीसारखे इस्लामी कट्टरपंथी नेतेसुद्धा सांप्रदायिक उन्माद भडकवित आहेत. सांप्रदायिक वातावरणाचा आणि दंग्यांचा लाभ निवडणुकांमध्ये हिंदुत्त्ववादी कट्टरपंथियांना मिळणार आहे, आणि ओवेसीसारख्या इस्लामी कट्टरपंथियांनासुद्धा मिळणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस, सीपीआई, सीपीएम, सपा, बसपा, आप, राजद, जद (यु) यांसारख्या तथाकथित सेक्युलर पक्षांनासुद्धा मतांच्या धृवीकरणाचा लाभ मिळणार आहे. आणि या तणावाच्या वातावरणात कोणाच्या जिविताची आणि मालमत्तेची हानी होणार आहे? सामान्य कष्टकरी जनतेच्या, मग ते हिंदू असोत वा मुसलमान.
मित्रांनो, जरा विचार करा! ६७ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ज्यावेळी देशात आर्थिक संकट, महागाई, बेरोजगारी, भूकबळी आणि गरीबी वाढली त्याच वेळी दंगे कां भडकले? सांप्रदायिक शक्ती नेहमी तेव्हाच कां सक्रिय होतात ज्यावेळी देशातील जनतेमध्ये व्यवस्थेच्या विरोधात चीड निर्माण होते? नेहमी मंदिर आणि मशिदीचा आणि धर्मांतरणाचा मुद्दा तेव्हाच कां वर काढला जातो ज्यावेळी देशात एक राजकीय संकट निर्माण होते आणि व्यवस्था धोक्यात येते? मित्रांनो, जरा विचार करा! ६७ वर्षांमध्ये झालेल्या दंग्यांतून कधी आपल्याला काही मिळाले आहे का? गरीब कष्टकरी जनतेसाठी मंदिर मशिद बनणे वा न बनणे हा खरा मुद्दा आहे की महागाई, गरीबी आणि बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे? मित्रांनो, आपण किती काळ या निवडणुकांतील मदाऱ्यांना आपल्याला धर्म आणि जातीच्या नावाने गंडवण्याची संधी देत राहणार?
सत्य हे आहे की ना हिंदू कट्टरपंथियांना सामान्य गरीब कष्टकरी हिंदूंच्या भल्याशी काही देणेघेणे आहे, ना मुसलमान कट्टरपंथियांना सामान्य गरीब कष्टकरी मुसलमानांच्या भल्याशी काही देणेघेणे आहे. हर तऱ्हेचे धार्मिक कट्टरपंथी वास्तविक टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, बिर्ला सारख्यांच्या तुकड्यांवर जगताहेत आणि त्यांचीच सेवा करीत आहेत! हे सगळे भांडवलदार एकीकडे भाजपाला कोट्यावधी रुपयांची देणगी निवडणुकीसाठी देतात आणि दुसरीकडे काँग्रेस व इतर पक्षांनासुद्धा कोट्यावधी रुपयांची देणगी देतात, हा केवळ योगायोग आहे का? म्हणच आहे, ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी! निवडणुकांचे राजकारण करणाऱ्या या पक्षांकडून कोणतीही अपेक्षा करणे फोल आहे. जगभरातील सत्ताधारी वर्ग आज जनतेमध्ये धार्मिक उन्माद पसरविण्याचा भयंकर खेळ खेळत आहे कारण ते संकटात सापडले आहेत आणि जनतेला बेरोजगारी, गरिबी, दारिद्र्य याशिवाय आणखी काहीही देऊ शकत नाहीत. म्हणूनच, सामान्य जनता त्यांच्याविरोधात विद्रोहाचा बिगुल फुंकेल अशी त्यांना भीती वाटते, म्हणूनच ते जनतेमध्ये धार्मिक कट्टरता पसरवून तिला तुकड्यातुकड्यांमध्ये विभागण्याचे काम करतात. जनतेला याचे किती भयंकर मोल चुकवावे लागते हे अलीकडेच आपण पेशावरमध्ये झालेल्या निरागस शाळकरी मुलांच्या हत्याकांडाच्या घटनेवरून पाहिले, त्याअगोदर २००२चे गुजरात दंगे आणि १९८४ च्या सिखविरोधी दंग्यांमध्ये पाहिले, १९९२-९३ च्या देशव्यापी दंग्यांमध्ये पाहिले. इतक्या वेळा फसवणुकीला बळी पडल्यानंतर आपण पुन्हा एकदा धार्मिक कट्टरपंथियांना आपल्याला मूर्ख बनविण्याची संधी द्यायची का? आपण त्यांना पुन्हा एकदा देशाला धार्मिक दंग्यांच्या आगीत लोटण्याची परवानगी द्यायची का? हा प्रश्न आज देशातील तमाम न्यायप्रिय, समजदार तरुण, नागरिक आणि कष्टकऱ्यांच्या समोर उभा आहे.
शहीदे आजम भगतसिंहांचा संदेश : झुंजार जनएकजूट निर्माण करा! खऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्याची तयारी करा!
महान क्रांतिकारी शहिदे आजम भगतसिंह यांनी म्हटले होते की सामान्य गरीब कष्टकरी जनतेचा एकच धर्म असतो वर्गीय एकजूट! आपल्याला सर्व प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना नाकारावे लागेल आणि त्यांच्या विरोधात लढावे लागेल. आपल्याला शपथ घ्यावी लागेल की आपण आपल्या गल्लीबोळात, मोहल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना सांप्रदायिक उन्माद भडकवू देणार नाही आणि त्यांना पिटाळून लावू! आपल्याला मागणी करावी लागेल की केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी धर्माला राजकारण आणि सामाजिक जीवनापासून वेगळे करण्यासाठी कडक कायदा बनवावा. धर्म भारतीयांची खाजगी बाब असली पाहिजे व कोणत्याही पक्ष, दल, संघटना किंवा नेत्याला धर्म किंवा धार्मिक संप्रदायाच्या नावाखाली राजकारण केल्यास, वक्तव्ये केल्यास व उन्माद भडकविण्याचा प्रयत्न केल्यास कडक शिक्षा दिली गेली पाहिजे व त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आला पाहिजे. आपण अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे जिची कल्पना भगतसिंह आणि त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांनी केली होती : एक अशी व्यवस्था जिच्यामध्ये उत्पादन, सत्ता आणि सामाजाच्या संरचनेवर उत्पादन करणाऱ्या वर्गाचा हक्क असेल आणि निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याच हाती असेल. तेथे जात वा धर्माच्या नावाखाली विभाजन असणार नाही. तिथे माणसाकडून माणसाची लूट अशक्य असेल. तिथे सारे उत्पादन समाजातील लोकांच्या आवश्यकतेसाठी असेल, मूठभर लुटारूंच्या नफ्यासाठी नाही. अशी व्यवस्थाच आपल्याला एकीकडे भूक, गरिबी, बेरोजगारी, महागाई, भूकबळी यांच्यापासून मुक्ती देऊ शकते आणि दुसरीकडे धार्मिक उन्माद, सांप्रदायिकता आणि दंग्यांपासूनही मुक्ती देऊ शकते. एका अशा व्यवस्थेतच आपण निश्चिंतता आणि स्वाभिमानाचे जीवन जगू शकतो. जर आपण याच वेळी ही बाब समजून घेतली नाही तर येत्या काळात देश तुकड्या तुकड्यांमध्ये फुटून जाईल व दंग्यांच्या व जातियतेच्या आगीत होरपळून जाईल.
जाति धर्माचे झगडे सोडा, ऱ्या लढ्याशी नाते जोडा!
सांप्रदायिक फासीवादाला प्रत्युत्तर – ‘इंकलाब जिंदाबाद’!
नौजवान भारत सभा
यूनीव्हर्सिटी कम्युनिटी फॉर डेमॉक्रेसी एण्ड इक्वॉलिटी
बिगुल मजदूर दस्ता

संपर्क : विराट ९६१९०३९७९३, नारायण ९७६९९०३५८९ ई-मेल : ucde.mu@gmail.com
फेसबुक पेज : www.facebook.com/naujavanbharatsabha
https://www.facebook.com/ucdemu

1 comment: