धर्माच्या नावाखील जनतेला तोडण्याची मोहीम हाणून पाडा! झुंजार जनएकता निर्माण करा!!

सांप्रदायिक फासीवाद मुर्दाबाद!       जनतेचे बंधुत्व जिंदाबाद!        इंकलाब जिंदाबाद!

धर्माच्या नावाखील जनतेला तोडण्याची मोहीम हाणून पाडा!
झुंजार जनएकता निर्माण करा!!

देशातील शूर व न्यायप्रिय मित्रहो,

मुजफ्फरनगरमध्ये दंगे होऊन थोडाच कालावधी लोटला आहे. या दंग्यांमध्ये ४९निरपराध मृत्यूमुखी पडले, अनेकानेक जखमी झाले आणि घरदार उद्ध्वस्त झालेल्या ४० हजारांहून अधिक लोकांना शरणार्थी शिबिरांमध्ये आश्रय घेणे भाग पडले. एकंदर सर्वच राजकीय पक्षांचे नेते धार्मिक वक्तव्ये करून दंग्यांच्या आगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेताना दिसले, परंतु त्यातही भगव्या गटाच्या नेत्यांनी या शर्यतीत सर्वांनाचा मागे टाकले. या धार्मिक फासीवाद्यांनी लोकांना अनेक वर्षांपूर्वीचे व्हिडिओ दाखवून- ज्यांचा मुजफ्फरनगरच काय तर आपल्या देशाशीदेखील कोणताच संबंध नव्हता- खोट्या अफवा पसरवून आणि पंचायतींमध्ये लोकांच्या “पौरुषा”ला साद घालून दंगे भडकवले. अवघे निवडणूकांचे मदारी जाणून आहेत की २०१४ च्या निवडणुकांपूर्वी रक्ताचा पाऊस पडला तर मतांचे पीक चांगले येईल. मुजफ्फरनगरमधील दंगा ही पहिली घटना नाही तर दंग्यांच्या संख्येत पडलेली आणखी एक भर आहे. गेल्या वर्षी आसामच्या दंग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडले आणि लाखो लोक विस्थापित झाले. त्यापूर्वीदेखील स्वातंत्र्यप्राप्तीपासून २००२ ची गुजरात दंगल, १९९३ ची मुंबई दंगल, १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर भडकलेल्या दंगली, १९८९ ची भागलपूर दंगल, १९८७ ची मेरठ दंगल, १९८४ ची दिल्लीतील दंगल, १९६९ ची अहमदाबाद दंगल इत्यादी मोठ्या दंगली झालेल्या आहेत. दंग्यांच्या छोट्यामोठया घटना तर लोकांसमोर येतच नाहीत. वेळोवेळी होणार्या या दंग्यांमध्ये आत्तापर्यंत हजारो निरपराध लोक मारले गेले आहेत, हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले आहेत, हजारो मुले अनाथ झाली आहेत आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत.
निरपराधांच्या चितेवर आपापले व्होटबँकचे राजकारण करणार्या आपल्या तथाकथित लोकप्रतिनिधींकडे वळण्यापूर्वी आम्ही या देशातील कष्टकरी जनता आणि सर्वसामान्य नागरिकांना विचारू इच्छितो की सांप्रदायिक भाषणे आणि चिथावणीखोर वक्तव्यांनी आपले रक्त खवळू देण्यापूर्वी आपण स्वतःलाच हा प्रश्न का विचारत नाही की अशा दंग्यांमध्ये राजनाथ, तोगडिया, ओवैसी, आजम खाँ, राज ठाकरे, अडवाणी किंवा मोदींसारखे लोक कधी मरतात का? कधी त्यांच्या घरातील महिलांवर बलात्कार होतात का? किंवा कधी त्यांच्या मुलांचे बळी पाडले जातात का? याचे उत्तर असेल, नाही. कारण मृत्यूचे हे तमाम सौदागर दंग्यांच्या ज्वाळा भडकावून झेड श्रेणीची सुरक्षा आणि गाड्यांच्या ताफ्यासह आपल्या स्वर्गात जाऊन पोहोचतात. परंतु आपण मात्र आपल्याच वर्गबंधूंशी रक्ताची होळी खेळून वातावरण नरक बनवतो. गल्ल्या आणि रस्ते निरपराधांच्या रक्ताने लाल होऊन जातात, आणि आपल्याच लोकांची प्रेते रस्त्यावर जळत असतात. मित्रांनो, जर आपण अजूनही सावध झालो नाही आणि मुसोलिनी आणि हिटलरच्या अनौरस संतानांना ओळखले नाही तर आपण आणि मेढ्यांच्या कळपात फारसा फरक राहणार नाही.

सांप्रदायिक फासीवाद व त्याची कारणे समजून घ्या, त्याची मुळे खणून काढा!

मित्रांनो, आपण एका अशा समस्येला तोंड देत आहोत जी सामाजिक भ्रातृत्व, शांती, आणि सौहाद्र्राला फार मोठा धोका आहे. फासीवाद आणि सांप्रदायिकता यांसारखे शब्द निश्चितच ऐकायला काहीसे जड वाटतात, परंतु यांना समजून घेणे तेवढेसे कठीण नक्कीच नाही. जनतेतील भ्रातृत्व आणि एकतेच्या शत्रूंची ओळख त्यांना समजून घेताच सहज पटू शकते. फासीवाद ती विचारधारा आहे जिचे इटलीचा हुकुमशहा मुसोलिनी, आणि त्यांनंतर त्याच्याहीपेक्षा अधिक भयंकर रूपात जर्मनीचा हुकुमशहा हिटलरने अनुसरण केले. फासीवादी पद्धतीने वंश आणि धर्माच्या आधारावर लोकांना वेगळे पाडून यातनाशिबिरांमध्ये उघडपणे अल्पसंख्यकांच्या हत्या घडवून आणल्या गेल्या. फासीवाद नेहमी सांप्रदायिकता, वंशवाद, क्षेत्रवाद यांचा अंगरखा पांघरून येतो, परंतु त्याचा खरा हेतू असतो भांडवलदारांची नग्न हुकुमशाही लागू करणे. जर्मनी व इटली या दोन्ही देशांमध्ये फासीवाद्यांनी तेथील मोठमोठ्या भांडवलदारांची मनापासून सेवा केली आणि कामगारांचा प्रत्येक अधिकार पायदळी तुडवून त्यांना गुलामांप्रमाणे राबविण्यात आले. ट्रेड युनियन बनविण्याचा, संप करण्याचा अधिाकरसुद्धा त्यांच्यापासून हे सांगून हिरावून घेण्यात आला की कामगारांच्या आंदोलनामुळे देश व राष्ट्राचे नुकसान होते. धार्मिक अल्पसंख्यांक व सर्व प्रकारच्या राजकीय विरोधकांना राष्ट्रविरोधी घोषित करून अगोदर तुरुंगात डांबण्यात आले, व नंतर त्यांना जीवे मारण्यात आले. स्त्रियांचे भीषण दमन करण्यात आले, त्यांना केवळ यशस्वी पुरुष पैदा करण्याचे यंत्र घोषित करण्यात आले. फासीवादी नेहमीच असली कुकर्मे देशसेवा, प्राचीन संस्कृतीचे संरक्षण, धर्मरक्षा यांसारख्या नावांखाली करतात व स्वतःला सर्वात मोठे राष्ट्रवादी घोषित करतात, जसे आपल्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक करताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात ८० टक्के कष्टकरी जनतेचे सर्व हक्क हिरावून त्यांना राष्ट्रापासून बेदखल करण्यात येते. त्यांना शोषणाच्या अग्निकुंडात फेकून दिले जाते। म्हणजेच फासीवाद्यांच्या राष्ट्रामध्ये देशातील बहुसंख्य कष्टकरी जनतेला स्थान नसते. मग मोदी, राजनाथ यांच्या राष्ट्रात सर्वाधिक प्रतिष्ठा कोणाला आहे? टाटा, बिर्ला, जिन्दल, मित्तल, अम्बानी यांसारख्या लुटारूंना जे अवघ्या देशाला लुटायला उत्सुक आहेत. राष्ट्राच्या विकासाच्या नावाखाली प्रत्यक्षात फासीवादी गट या लुटारूंना लुटण्यासाठी रान मोकळे करून देतात व जो कोणी याच्या विरोधात आवाज उठवतो तो राष्ट्रविरोधी, देशविरोधी, आतंकवादी व विकासविरोधी घोषित केला जातो. म्हणजेच फासीवाद प्रत्यश्रात दुसरे तिसरे काही नसून लुटारू भांडवलदारांची नग्न हुकुमशाही असते. जेव्हा जेव्हा एखाद्या देशात भांडवलदारी आर्थिक व्यवस्थेवर संकट कोसळते, महागाई, बेरोजगारी, बेघरांची समस्या व दारिद्र्य आकाशाला भिडते आणि जनतेचा भांडवलदारी व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागतो, नेमक्या अशा वेळी सांप्रदायिक फासीवादाचे वारे वाहू दिले जातात. अकस्मात मंदिर किंवा मशीद बनवणे हा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा बनतो, कष्टकरी हिंदू आणि मुसलमानांना एकदुसर्याचे शत्रू बनविले जाते, एक संप्रदाय दुसर्या संप्रदायाचे रक्त पिण्यास उतावीळ होतो, आणि ते सारे मुद्दे जे सर्वसामान्य माणसासाठी सर्वांत जास्त महत्वाचे असतात, बाजूल पडतात. फासीवादी गट नेमक्या अशाच वेळी घोषणा करतात की देशाला वाचविण्यासाठी एका “कठोर” नेतृत्वाची आवश्यकता आहे, कुणाला “लोहपुरुष” घोषित केले जाते तर कुणाला भारतमाता का शेर. हे कठोर नेतृत्व कोणा प्रति कठोर असते, या भारतमाता का शेरला कुणाच्या रक्ताची तहान असते? देशातील कोट्यावधी कामगार, शेतकरी, आणि सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या प्रतिच ते कठोर असते. आणि जेव्हा टाटा, बिर्ला, अम्बानी यांसारख्यांची पाळी येते तेव्हा हे कठोर नेतृत्व त्यांच्यासमोर अचानक मुलायम होते, भारतमाता का शेर आपले दात आणि नखे गमावून त्यांच्या ताटाखालचे मांजर बनतो. आज भारतसुद्धा महागाई, बेरोजगारी, बेघरांची समस्या आणि दारिद्र्याच्या संकटाचा सामना करतो आहे, भांडवलदारी आर्थिक संकट सार्या जगाप्रमाणेच भारतातही तीव्र होते आहे. त्यामुळे जगाच्या इतर भागांप्रमाणेच इथेसुद्धा एक नवी सांप्रदायिक फासीवादी लाट येते आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीवर एक दृष्टिक्षेप टाकताच लगेच लक्षात येर्ईल की येथील अमीरजाद्यांना आज फासीवाद एवढा आवश्यक कां वाटू लागला आहे.
टाईम पत्रिकेनुसार देशातील खर्वाधिशांची संख्या ४६ हून वाढून ५५ झाली आहे. परंतु दुसरीकडे मानव विकास सूचकांकाच्या बाबतीत भारत देश १४६ देशांच्या यादीत १२९व्या स्थानावार आहे. भांडवलदारांच्या नफ्याचे रक्षण करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात कर माफी आणि बेल आऊट पॅकेजसारख्या सवलती दिल्या जातात परंतु देशातील ४६ टक्के मुले, जवळपास ५० टक्के स्त्रिया कुपोषण आणि रक्ताच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. लाखो टन धान्य गोदामांमध्ये सडत असूनही लोक भूक, कुपोषणातून होणार्या आजारांनी मृत्युमुखी पडत आहेत. प्रचंड नैसर्गिक संसाधने, मानव संसाधन आणि अमाप विकासाकामांची आवश्यकता असूनदेखील २८ कोटी लोक, ज्यांपैकी ४ कोटी सुशिक्षित तरूण आहेत, बेरोजगार आहेत. देशातील ९३ टक्के कामगार असंगठित अनौपचारिक कामागारांच्या रूपात, कोणत्याही श्रमकायद्याच्या अभावी आधुनिक गुलामांसारखे राबत आहेत.
गरिबी, दारिद्र्य यामुळे गेल्या १२ वर्षांमध्ये देशातील २ लाखांहून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातील अशा परिस्थितीमुळे भांडवलदारवर्गाला हे नको आहे की देशातील कष्टकरी वर्ग जो सारे काही निर्माण करतो, तो एकजूट होऊन त्यांच्या स्वर्गावर चाल करून यावा. म्हणूनच तो हर प्रकारे सांप्रदायिक फासीवाद्यांचे जबरदस्त समर्थन करतो आहे. भारतातील तमाम मोठी भांडवलदार घराणी २००२ च्या गुजरात दंग्यांचे शिलेदार नरेंद्र मोदी यांच्या वायब्रंट गुजरातचे तोंड भरून कौतुक करीत आहेत, ज्याच्या सरकारमधील मंत्र्यांवरदेखील दंगलींमध्ये सक्रीय सहभाग असल्याबद्दल अजूनही खटले सुरू आहेत. भारतातील फासीवद्यांच्या कार्याचा दीर्घ इतिहास आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या बाता मारणार्या भगव्या गटाची मुळे खणून पाहिली तर हे तथ्य उघड होईल की स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून यांचा इतिहास खोटारडेपणा, लबाडी, फितुरी आणि इंग्रजांना सादर केलेले माफीनामे यांचा इतिहास राहिला आहे. स्वतःला सांस्कृतिक ध्वजधारक म्हणवून घेणार्या संघवाल्यांची समझौता एक्सप्रेस, मक्का मशीद, मालेगाव, अजमेर शरीफ इत्यादी बॉम्बस्फोटातील भागीदारी आज सर्वांसमोर उघड झाली आहे. यांच्या ठिकाणांहून कित्येकदा विस्फोटक सामान आणि नकली दाढी मिशा व टोप्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये दारिद्र्यरेषा एवढी हास्यास्पदरित्या खाली असूनही, २३ टक्के लोक तिच्याखाली जगत आहेत, ४० टक्के मुले कुपोषणाने ग्रस्त आहेत, भारतातील ५० सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांपैकी ६ जिल्हे गुजरातमध्ये आहेत. येथे कामगारांची अवस्था भीषण आहे, केवळ भांडवलदारांचा विकास होतो आहे. मोदींचे वायब्रंट गुजरात एक भीषण असत्य आहे, जे विकाऊ मिडियाद्वारे पसरविले जात आहे. मोदीने आपली लखलखीत प्रतिमा निर्माण करण्यासाठी एप्को वल्र्डवाईड नामक कुख्यात कंपनीला प्रचाराचा ठेका दिला आहे, व या कामासाठी ऑगस्ट २००७ ते मार्च २०१३ पर्यंत दर महिना २५००० डॉलर दिले आहेत. मोदीचे विकास मॉडेल हे मनमोहनच्याच विकास मॉडेलचे नग्नतम रूप आहे. हेच लोक आहेत जे देशात सांप्रदायिक उन्माद भडकावून दंग्यांच्या लाटेवर स्वार होऊन सत्तेत येण्याचे स्वप्न पाहात आहेत. वास्तविक, हे खूनी, लबाड, ढोंगी हिटलर व मुसोलिनीसारख्या फासीवाद्यांची अनौरस संताने आहेत.

समान जनसंस्कृती आणि समान संघर्षाचा वारसा आठवा! फासीवादाचा फणा ठेचून काढा!!

मित्रांनो, इंग्रजांची फूट पाडा आणि राज्य करा ची नीती आणि आर. एस. एस. तसेच मुस्मिल लीगच्या सर्व चालींवर मात करून आपल्या देशात अशा जनसंघर्षांचा दीर्घ इतिहास आहे, जेव्हा लोक धर्माच्या भिंती ध्वस्त करून, खांद्याला खांदा भिडवून आपल्या समान शत्रूविरोधात लढ्यात उतरले आहेत. मग तो १८५७ चा पहिला स्वातंत्र्य लढा असो, भगतसिंह, आजाद, अश्फाक उल्ला खां आणि रामप्रसाद बिस्मिल यांचा संघर्ष असो, किंवा तेलंगाणा तेभागा वा नौसेना विद्रोह असो. आपल्या देशाच्या शूर जनतेने आजवर विलक्षण शौर्यगाथा रचल्या आहेत. जेव्हा जनता आपल्या धार्मिक ओळखीच्या पलीकडे जाऊन वर्गीय एकतेसह समान शत्रूच्या विरोधात उभी ठाकते तेव्हाच तिच्या वास्तविक समस्यांचे निवारण होऊ शकते. संसदीय डाव्या पक्षांनी केलेल्या फासीवादाच्या षंढ विरोधाने किंवा कोणत्याही प्रकारच्या शालीन, एनजीओवादी, सुधारणावादी विरोधाने काहीच हाती लागणार नाही. देशातील संघटित कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि न्यायप्रिय नागरिकांची झुंजार पोलादी एकताच फासीवादाला परास्त करू शकते, आणि करेल. फासीवाद सत्तेत येवो अथवा न येवो, तो नेहमीच भांडवलदारांच्या हातातील साखळीने बांधलेल्या कुत्र्याप्रमाणे सामान्य कष्टकरी जनतेवर भुंकत राहील, व संधी मिळताच त्यांचे लचके तोडत राहील. ती वेळ आली आहे जेव्हा कष्टकर्यांच्या झुंजार एकतेच्या बळावर आपल्याला या विषारी नागाचा फणा ठेचला पाहिजे. आपण शहीदे आजम भगत किंसह यांच्या संदेशाचे स्मरण केले पाहिजे ज्यात त्यांनी सांगितले होते की लोकांना परस्परांमध्ये लढण्यापासून रोखण्यासाठी वर्गचेतनेची आवश्यकता आहे. गरीब कष्टकरी व शेतकर्यांना स्पष्टपणे समजावून दिले पाहिजे की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत, म्हणूनच तुम्ही यांच्या डावपेचांपासून सावध राहिले पाहिजे व त्यांच्या आहारी जाऊन काहीही करता कामा नये. यातच तुमचे भले आहे की तुम्ही धर्म, वर्ण, वंश व राष्ट्रीयता आणि देश यांमधील भेदभाव नष्ट करून एक व्हा आणि राज्यशक्ती आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करा. दंगे आणि सांप्रदायिक नरसंहार यांनी ज्यांचे मन अस्वस्थ होत नाही तेसुद्धा समाजासाठी एक कलंक आहेत, व काळ त्यांचा इतिहास काळ्या अक्षरात नोंद करील. आपले हुतात्मे आज आपल्याला सवाल करत आहेत- काय या विशाल देशात काही लाख युवकसुद्धा असे नाहीत जे या देशातील जनतेच्या आत्म्यामध्ये स्पंदन निर्माण करण्यासाठी आणि देशाला फासीवादापासून मुक्त करण्यासाठी संकल्पबद्ध आहेत?

जातीधर्माचे तंटे सोडा!
र्या लढ्याशी नाते जोडा!!
कष्टकर्यांची वर्गएकता- जिंदाबाद!

पक्षधर विचार मंचयुनिवर्सिटी कम्युनिटी फॅार डेमोक्रेसी एण्ड इक्वॉलिटी
सम्पर्कः- प्रशांत-9619039793नारायण- 9769903589
ईमेल- ucde.mu@gmail.com


No comments:

Post a Comment