बंगळुरू आणि दिल्लीच्या घटना : नवउदारवादी भारतातील नवश्रीमंत वर्गाच्या लंपट आणि अपराधी चारित्र्याचा परिणाम


बंगळुरू आणि दिल्लीच्या घटना : नवउदारवादी भारतातील नवश्रीमंत वर्गाच्या लंपट आणि अपराधी चारित्र्याचा परिणाम
आता जर लढलो नाही, तर अन्याय वाढतच जाईल!
दोस्तहो,
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळुरू आणि दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या छेडछाडीच्या घृणास्पद घटनांनी विचारकरणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अंतःकरणाला अगदी हलवून सोडले आहे .प्रत्येक संवेदनशील माणूस या घटनांबाबत संताप आणि आक्रोश व्यक्त करत आहे . या घटनांनी आपल्या समाजमनात  घर करून बसलेल्या पितृसत्ताक मानसिकतेचा पाशवीपणा पुन्हा उजेडात आणला आहे. शहरांत राहणाऱ्या नवउदारवादी,  आधुनिकआणि सुशिक्षितनवश्रीमंत आणि उच्च मध्यम वर्गाचं लबाड चारित्र्य या घटनांनी पुन्हा उजेडात आणलंय. एका बाजूला ग्लोबल ब्रॅंडचे कपडे, बूट, गाड्या आणि साधन-सामग्रीने सज्ज असणारा हा वर्ग कसा लोकशाही विरोधी, स्त्री विरोधी आणि कामगार विरोधी आहे याचे दाखले सतत पाहायला मिळतात, पण नविन वर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळुरू आणि दिल्लीमधील सामूहिक छेडछाड आणि पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न होताच, पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांनी या वर्गाचं गुन्हेगारी आणि लंपट चारित्र्य कधी नव्हे इतकं नागडं केलं आहे.
या घटनांनंतरही पोलिस प्रशासन काही खास कामगिरी करू शकले नाही . अपेक्षेप्रमाणे काही खास करू शकणारही नाही. कारण रस्त्यावर खात्यापित्या घरातली बिगडी औलादे”, दलाल, नोकरशहामंत्र्यांचे नातेवाईक किंवा सगे-सोयरे, बडे व्यापारी, डीलर, श्रीमंत शेतकरी-जमीनदारांची पोरं होती. पण जर कधी कामगार वा सामान्य तरुण, स्त्रिया, कष्टकरी दलित, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर आले असते, तर पोलिसांनी लाठी चार्ज केला असता , अश्रुधूराच्या नळकांडया फोडायला उशीर लावला नसता. लगेचच सी.आर.पी.एफ. आणि आर ए एफ च्या बटालियनांना निरोप धाडला असता आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढणार्‍या युवकांवर , कामगारांवर, स्त्रियांवर, दलितांवर ही सत्ता पार तुटून पडली असती. पण नवश्रीमंतांच्या औलादी जेव्हा एकत्र येवून रस्त्यावर गोंधळ घालतात, मुलींना स्कूटरवरुन खाली ओढतात, असभ्य वर्तन करतात, तेव्हा हे पोलिस असहाय असतात. इतके की त्यांच्या हातून ते चांगलाच मार खात होते आणि पळूनही जात होते. कारण या गर्दीत नेता-मंत्री-नोकरशहा अथवा त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या बड्या असामींची पोरं आहेत. तेव्हा पोलीस जास्तीतजास्त त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना सांगूनही समजत नाही म्हटल्यावर पोलीसच समजून घेतात.
दोस्तहो, हे समजून घ्या की या घटना अपवाद नाहीत. अशा घटना या नवश्रीमंत वर्गाचं खरं चारित्र्य समोर आणतात. हा असा वर्ग आहे की ज्याच्याकडे गेल्या तीन दशकांमध्ये नवउदारवादी धोरणांच्या सुरू होण्यातून अचानक ढीगभर पैसा आला. हा आचानक श्रीमंत झालेला वर्ग स्वतःच स्वतःच्या समृध्दीमुळं चकित झाला आहे, तो पैशाच्या उन्मादामधे आहे. त्याला वाटतय की पैशानं सगळं काही विकत घेता येतं. तर दुसर्‍या बाजूला स्त्रियांना बाजारातील मालया रूपात सादर करणाऱ्या कार्पोरेट भांडवली संस्कृतीने माणूस आणि वस्तु यांतील अंतर या नवश्रीमंत वर्गासाठी अगदी संपवून टाकलंय. ते स्त्रियांना मांसाचा गोळा यापेक्षा अधिक काही समजत नाहीत. त्यांचे हीरो आहेत यो यो हनि सिंग, बादशाह सारखे बाजारू गायक, ज्यांच्या गाण्यात मानवी देहाची तुलना गाड्या आणि इतर उपभोग्य वस्तूंशी करणे यापेक्षा अधिक काहीच नसतं. हेच सांगतय की स्त्रिया त्यांच्यासाठी उपभोगाच्या वस्तूपेक्षा अधिक काही नाहीत. या नवश्रीमंत वर्गाच्या आत एक पाशवी, उन्मादी, रानटी तर्‍हेचा अधिकारबोध असतो. त्यामुळे त्याला वाटतं त्याच्याकडे पैसा आहे तर तो काहीही मिळवू शकतो. पितृसत्ता आणि भांडवलशाहीच्या घाणेरड्या युतीला अत्यंत रानटी, आक्रमक रूपात हाच वर्ग सादर करतो. निश्चितच, पितृसत्ताक मूल्ये सामान्य कष्टकरी समुदायातसुध्दा आहेत आणि विशेषतः लंपट सर्वहारा वर्ग (म्हणजे वर्ग जाणिवा नसलेला), व इतर लंपट वर्गांमधे त्याचं अतिशय किळसवाणं रूप पाहायला मिळतं , पण या गंगेची गंगोत्रि मात्र या देशातील भांडलदार वर्गाच्या, विशेषतः  नवश्रीमंत वर्गाच्या सत्ता आणि संस्कृतीत आहे. स्पष्टच आहे, की ज्यांच्या कडे मीडिया , शिक्षणाचे तंत्र आणि माहितीचे तंत्र यांचं नियंत्रण असेल, त्यांचीच मूल्ये , मान्यता आणि संस्कृती समाजातील इतर वर्गांवरही प्रभाव गाजवू लागते. (जोवर त्या वर्गाकडे कुठलाही क्रांतिकारी पर्याय उपलब्ध नाही तोवर तरी.) सोबतच, पितृसत्तेचा मामला फक्त मानसिक, सांस्कृतिक आणि मूल्यमान्यतेचा मामला नाही. खरं तर तो एक राजकीय मामला आहे आणि तो राजकीय सत्तेच्या प्रश्नाशी थेट जुळलेला आहे. पितृसत्तेच्या पालन पोषणाचं काम हेच भांडवली सत्ता तंत्र करत आहे. त्यामुळे पितृसत्तेच्या विरोधात आपण तेव्हाच प्रभावीपणे लढू शकू जेव्हा त्याला पोसणार्‍या प्रस्थापित सत्तेच्या विरोधात आपण लढू. त्यामुळं साथी, हे आवश्यक आहे की तुमची ही लढाई कॉलेज कॅम्पस पर्यंत मर्यादित करू नका. तिला त्या तमाम वस्त्यांपर्यंत घेवून जायला हवं, जिथं आपल्या बहिणींना, आपल्या सोबत्यांना आपल्या बाजूने करता येईल. आपण नेहमीच कॉलेज कॅम्पसमध्ये राहणार नाही आहोत. आपल्या संघर्षाला कॅम्पस पर्यंत मर्यादित करणं हा आत्मघात ठरेल .
जिथवर आपल्या स्वातंत्र्याचा, सुरक्षिततेचा आणि आत्मसन्मानाच्या लढ्याचा प्रश्न आहे, तर एक गोष्ट या घटनांनी अगदी स्पष्ट केली आहे : आपण पोलिस प्रशासनावर विसंबून या गुन्हेगारी तत्वांशी दोन हात करण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही.  पोलीसच जर त्यांना घाबरून पळ काढत असतील तर ते आपली सुरक्षा कशी करणार ? आपल्याला स्वतःच संघटित व्हावं लागेल आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी, सुरक्षेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी स्वतःच लढावे लागेल. जर आपण असं करणार नसू तर उद्या आपल्या पसंतीने जगणं, पेहराव करणं, खाणं-पिणं, जीवनसाथी निवडणं अशक्य होईल. आमचा प्रस्ताव आहे की लवकरात लवकर एका रॅलीचं आयोजन केलं जावं आणि रॅली कॉलेज कॅम्पसमधून सुरू करून आसपासच्या वस्त्यांमधून नेली जावी आणि सार्वजनिक ठिकाणांवर आपला हक्क सांगावा. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ज्या घटना घडल्यात त्याला  उत्तर म्हणून जर आपण असं करणार नसू तर मग या गुन्हेगार, पतित आणि स्त्री विरोधी नवश्रीमंत वर्गाचं बळ वाढत जाईल .या जडत्वाला तोडा साथींनो, बंधनांना तोडा बहीणींनो ! जर तुम्हांला वाटत असेल की असं करायला हवं तर खाली दिलेल्या नंबर वरती फोन करा.

सूर्य कधीचा अंधारला, चला यार हो, नवा सूर्य आणू चला यार हो !
संघर्षरत स्त्रिया, विद्यार्थी, युवक आणि कामगारांची एकजूट झिंदाबाद !

l स्त्री मुक्ती लीग
l दिशा विद्यार्थी संघटना
l यूनीवर्सिटी कम्युनिटी फॉर डेमोक्रेसी एण्ड इक्वॉलिटी (यूसीडीई)
संपर्क: – मुंबई - 9764594057, 9145332849, 9923547074 अहमदनगर - 8888350333, 9156323976
फेसबुक पेज - www.facebook.com/streemuktileague , www.facebook.com/ucdemu
ईमेल -
ucde.mu@gmail.com ब्‍लॉग - ucde-mu.blogspot.com 

No comments:

Post a Comment